खेड : खेडमध्ये गुरुवारी (दि. १८) पहाटे ४ ते ६.३० वाजण्याच्या कालावधीत चारवेळा भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगर येथील धरणापासून ४१.६ किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खेड तालुक्यातील अस्तान, खोपी, शिरगाव, सवेणी, मोहाने, आंबवली, बिजघर, तिसंगी, एनवरे, ऐनवली, तळे अशा सुमारे ४७गावांमध्ये गुरुवारी पहाटे ४ वाजल्यापासून भूकंपाचे धक्के जाणवले. खेड शहरातही भूकंप झाल्याचे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी अनुभवले.
खेड परिसरात भूकंपाचे धक्के
खेडमध्ये गुरुवारी (दि. १८) पहाटे ४ ते ६.३० वाजण्याच्या कालावधीत चारवेळा भूकंपाचे धक्के बसले.
Similar Posts
View All
ग्रामस्थांशी थेट संवाद आणि गावचा इतिहास जपण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गुडघे गावात ‘आपुलकीचा मुक्काम’
दापोली आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ए. जी. हायस्कूलचे दणदणीत विजेतेपद; सरस्वती विद्यामंदिर ओणणवसे उपविजेते
महाराष्ट्र साहित्य परिषदेत मोठी उलथापालथ; अविश्वास ठराव मंजूर होऊन सुनील महाजन नवे अध्यक्ष
भाजप आध्यात्मिक प्रकोष्ठ प्रदेश सहसंयोजकपदी कोकणातून अभिजीत घनवटकर आणि मोहन म्हात्रे यांची नियुक्ती
लांजा-राजापूरमधील शेती विकासासाठी आमदार किरण सामंत यांची कोकण कृषी विद्यापीठाला भेट

Leave a Reply