दापोली पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगर आयशा महेक अव्हेन्यू पहिला मजला रुम नं. १०३ ता. दापोली जि. रत्नागिरी येथे राहणा-या फराह मिन्नत टेटवलकर वय २७ यांचे मुलांचे शाळेला सुट्टी असल्याने त्या दिनांक १२/०८/२०२३ रोजी सायंकाळी ४.०० वा. चे दरम्याने आपला फ्लॅटचे पुढील दरवाजाला कुलूप लाऊन बंद करुन मुलांसह त्यांचे आईवे घरी टेटवली ता. दापोली येथे गेल्या होत्या.

त्या दिनांक १६/०८/२०२३ रोजी दुपारी ३.३० वा.चे दरम्याने आपले घरी परत आल्या त्यावेळी त्यांनी त्यांचे घराचे कुलूप उघडुन दरवाजा ढकलला असता तो उघडला नाही.

त्यानंतर घरात प्रवेश केला असता घरातील लाकडी कपाटातील चांदीचे दागिने असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला म्हणून फराह मिन्नत टेटबलकर यांनी दिनांक १७/०८/२०२३ रोजी दापोली पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे.

ही माहिती प्राप्त होताच दापोदी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी दुय्यम पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन आरोपीचा शोध घेण्याबात सूचना दिल्या. त्याप्रमाणे दापोली पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.

त्यानंतर दापोली पोलीसांनी गुप्त बातमीदाराद्वारे माहिती प्राप्त करुन तसेच रत्नागिरी येथुन श्वान पथक पाचारण करून डॉग रम्बो याच्या मदतीनं शोध घेऊन आरोपी साकीब नासीर मुल्ला वय २२ वर्षे रा. रामराजे कॉलेजजवळ दापोली याला अटक करून त्याचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला माल हस्तगत केला आहे. तसेच त्याने दापोली पोलीस ठाणे गु.र.नं. १३४/२०२३ भा.द.वि.क. ४५४४५७, ३८० या गुन्ह्यामध्ये चोरी केल्याची कबुली दिलेली आहे, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र मुणगेकर यांचे सुचनेप्रमाणे सदर कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक श्री राजकुमार यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, स्वप्नील शिवलकर, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, विजेंद्र सातार्डेकर, सुहास पाटील, सुरज मोरे, पंकज पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल ढोले यांनी सहभाग घेतला.

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांचे सुचनेप्रमाणे या कामगिरीमध्ये पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, स्वप्नील शिवलकर, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, विजेंद्र सातार्डेकर, सुहास पाटील, सुरज मोरे, पंकज पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल ढोले यांनी सहभाग घेतला.