रत्नागिरी: लांजा-राजापूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. मुस्लिम समाजातील अनेक प्रमुख नेत्यांनी किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मतदारसंघात शिवसेनेची स्थिती अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसत आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुस्लिम समाजाचे नेते परवेझ घारे, मुस्लिम वेल्फेअर सोसायटी लांजाचे कार्याध्यक्ष अकिल नाईक, सर्फराज पन्हाळकर, समीर घारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत भगवा हाती धरला. या सोहळ्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी बोलताना नवनियुक्त कार्यकर्त्यांनी सांगितले की, किरण सामंत हे तळागाळातील जनतेच्या समस्या सोडवणारे नेतृत्व आहे. त्यांच्या विकासकामांच्या पद्धतीमुळे प्रभावित होऊनच आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करताना किरण सामंत म्हणाले की, शिवसेना ही सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालणारी संघटना आहे. मुस्लिम समाजाने जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. विकासकामांच्या माध्यमातून हा विश्वास सार्थ ठरवला जाईल, असे वचनही त्यांनी यावेळी दिले.
प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे:
या सोहळ्यात परवेझ घारे, सुहेल मापारी, जावेद पठाण, शब्बीर शेरखान, अब्दुल शेरखान, सय्यद अली शेरखान, महमद अली शेरखान, हुसेन खान पठाण, हसन महालदार, सरफराज पन्हळेकर, अकिल रफिक नाईक, खालिद मुल्ला, असलम घारे, अन्वर पन्हळेकर, नजीम घारे, अतीक पन्हळेकर, समीर घारे, फिरोज घारे, नदीम गावरी, समीर पन्हळेकर, इरफान पन्हळेकर, नजीर पन्हळेकर, नबील पन्हळेकर, अरीफ नाईक, शब्बीर नाईक, सय्यद मोईन खान, मोसिन पन्हळेकर, साहिल पन्हळेकर आणि फैजान पन्हळेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी काळात या राजकीय बदलाचा परिणाम मतदारसंघातील विकासाच्या गतीवर दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

