मुंबई: नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये पार पडलेल्या ‘आयसीएन (आय कॉम्पिट नॅचरल) मुंबई मॅजेस्टिक’ या प्रतिष्ठित शरीरसौष्ठव स्पर्धेत सरोश जफर दळवी याने चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेतील ‘टीनएज’ गटामध्ये 250 ट्रंक क्रमांक असलेल्या सरोशने आपल्या शरीरसौष्ठवाचे उत्तम प्रदर्शन करत हे यश संपादन केले.

सरोश सध्या नवी मुंबईतील नेरूळ येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात बॅचलर ऑफ स्पोर्ट्स सायन्सेसचे शिक्षण घेत आहे.

त्याच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

निवडलेल्या करिअरमध्ये सरोशने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.