आंजर्ले : कोणत्याही स्वप्नाचा रस्ता सरळ आणि सोपा नसतो, तसेच प्रत्येक जण तुमची विचारसरणी समजून घेईल किंवा तुमच्या मेहनतीला दाद देईल असेही नाही.

मात्र, संकटांशी सामना करत आपल्या मार्गावर ठाम राहून एकट्याने चालणे हा हार मानणे नसून तोच खरा विजय असतो, हे आंजर्ले गावच्या निनाद सुभाष जोशी याने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) यशस्वीरीत्या सेवा मिळवली आहे.

निनादने दाखवलेली जिद्द, चिकाटी, अतोनात मेहनत आणि प्रचंड आत्मविश्वास या गुणांच्या बळावर त्याने हे मोठे यश संपादन केले आहे.

आव्हानांचा स्वीकार करून आणि परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याची त्याची तयारी आजच्या तरुण पिढीसाठी एक उत्तम उदाहरण ठरली आहे.

ध्येय गाठण्याच्या प्रवासात त्याला अनेक अडचणी आणि संकटांना सामोरे जावे लागले, तरीही त्याने आपल्या ध्येयापासून पाय मागे घेतला नाही.

त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण आंजर्ले गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

निनाद आता आंजर्ले गावचा एक नवा आयकॉन बनला असून, त्याचे हे यश गावातील आणि परिसरातील इतर तरुणांना आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी मोठी प्रेरणा देणारे ठरेल यात शंका नाही.