गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेल्या जागेचा बिगरशेती परवाना रद्द -किरीट सोमय्या यांची माहिती

अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेल्या जागेचा बिगरशेती परवाना रद्द -किरीट सोमय्या यांची माहिती

दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अनिल परब यांनी रिसॉर्टसाठी घेतलेल्या जागेचा बिगरशेती परवाना रद्द करण्यात आला आहे.

हा परवाना फरवणुकीने घेण्यात आला होता त्यामुळे हा परवाना रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. बिगरशेती परवाना रद्द केल्याचं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने लोकायुक्तांकडे सादर केलं आहे.

राज्य सरकारनं अशाप्रकारचं पत्र सादर केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणात सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

anil parab, Dapoli, kirit somayya

Updated: 9 Dec 2021 12:41 PM

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *