माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राहणार उपस्थित

मुंबई : न्यू होरायझन्स फाउंडेशन मुंबई हेल्थ अँड रिसर्च आणि दुहिता यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्तनाचा कर्करोग: तुमचे प्रश्न आमची उत्तरे’ या पुस्तकाच्या मराठी आणि उर्दू आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

वसीम फोपलुनकर आणि शकूर तिसेकर यांनी आयोजित केलेला हा विशेष कार्यक्रम रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडणार आहे.

या पुस्तकाचे अनावरण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे माजी वैद्यकीय कर्करोग विभागप्रमुख सुरेश अडवाणी, दैनिक लोकसत्ताचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, ज्येष्ठ पत्रकार व माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर आणि बशीर एम. हजवानी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कर्करोगासारख्या गंभीर विषयावर जनजागृती करणाऱ्या या महत्त्वाच्या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि १७ ऑक्टोबरपर्यंत रफिक दलवाई तसेच उमेर अनिस इबजी यांच्याशी संपर्क साधून आपली उपस्थिती निश्चित करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.