दापोली: तालुक्यातील साखलोली येथे बुधवारी दुपारी इको कार आणि दुचाकी दरम्यान भीषण अपघात झाला.

या अपघातात दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

साखलोली येथील एका वळणावर दोन्ही वाहने वेगात असताना त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

अपघाताचा भीषण आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.

नागरिकांनी तत्परता दाखवत गंभीर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांना तातडीने उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

सध्या त्यांच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी अपघातस्थळी भेट दिली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.