दापोली | प्रतिनिधी
दापोली येथील नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्सने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. यंदा महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.४६ टक्के लागला असून २२६ पैकी २१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विशेष म्हणजे आर्ट्स शाखेने १०० टक्के निकालाची नोंद केली आहे, तर विज्ञान शाखेने ९८.७६ टक्के आणि कॉमर्स शाखेने ८० टक्के यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेत १६२ पैकी १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये जोबिया जावेद मुंगरुसकर हिने ९०.५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. इरम रफीक रखांगे (८३ टक्के) आणि अक्सा आसिफ काझी (८१.८३ टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. या शाखेत ५ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, तर २७ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे.
कॉमर्स शाखेत एकूण ३० पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अलजहरा शाहबाज देशमुख ८९ टक्के गुणांसह प्रथम आली, तर अजिजा आदम चौगुले (८३.६७ टक्के) आणि सादिया समीर नागुठणे (७७.१७ टक्के) यांनी यश मिळवले. या शाखेत ३ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. १०० टक्के निकाल लागलेल्या आर्ट्स शाखेत ३४ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आसिया इस्माईल काझी (८६.८३ टक्के), समरीन शबाब मस्तान (८६.३३ टक्के) आणि रुख्सार परवीन मोहम्मद इस्लाम (८४.१७ टक्के) यांनी आघाडी घेतली.
या यशात तन्वीर अराई, शबाना मुल्ला, मोहताशिम रखांगे, शाईस्ता गोडबा, अल्मास मुकादम, समीन उपाधे, तस्नीम खल्फे, संकेत चांदावडे, रवींद्र कदम, अजमत शेख, अर्शीन बागवान, अशफाक खान, अस्मिता कानडे, फरझीन जुवळे, मुमताज अरई आणि जमीर जमादार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य अय्युब मुल्ला, संस्थेचे अध्यक्ष नजीर पठाण, कौन्सिल चेअरमन लियाकत रखांगे, सचिव इक्बाल परकार, स्कूल कमिटी चेअरमन जावेद मणियार आणि कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन यांनी विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

