युवासेना सचिव पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी युवासेना दौऱ्यात रत्नागिरी येथे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी “युवा विजय महाराष्ट्र” दौऱ्याचे सन्मानचिन्ह त्यांना भेट देण्यात आले.

महाराष्ट्रभर सुरू असलेल्या युवासेना दौऱ्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच युवकांकडून युवासेना महाराष्ट्र दौऱ्याला मिळत असलेल्या प्रतिसादासंदर्भात संवाद साधण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
