रत्नागिरी: मिरकरवाडा मत्स्य बंदरात बंद, विनावापर, मोडलेल्या स्थितीत असलेल्या, बुडालेल्या व नष्ट झालेल्या नौकांचे इंजिन व इतर पार्ट्स काढून घेऊन कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे/ अवशेष बंदरात सोडून दिलेले आहेत.

यामुळे नौकानयनासाठी अडथळा होत आहे. बंदरातील जागा अनावश्यक व्यापली गेली आहे. हा अडथळा मच्छीमारी नौकांसाठी धोकादायक झाला आहे.

नौका/सांगाडे/अवशेष संबंधित नौकामालकांनी 8 मेपर्यंत बंदरातून स्वखर्चाने काढून टाकावेत, अन्यथा या नौका मत्स्यव्यवसाय विभागामार्फत काढून टाकण्यात येतील व संबंधित नौकामालकांना कोणत्याही नुकसानभरपाईचा दावा करता येणार नाही. होण्याऱ्या कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, याची नोंद घेण्याबाबत मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी कळविले आहे.