दापोली: सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरे विद्यालयाचा कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

परीक्षेस प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाने आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातील शाखांनुसार गुणानुक्रमे प्रथम तीन आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत:
वाणिज्य शाखा:
१) अदिती सुनील बैकर (७८.६७%)
२) तन्वी संदीप लाले (७८.३३%)
३) आर्यन अनिल भुवड (७७.६७%)

कला शाखा:
१) निखिल नरेश कुळे (७५.५०%)
२) सायली संतोष करंबेळे (७४.७३%)
३) सोहम राजेश जाधव (६३.३३%)

विज्ञान शाखा:
१) प्रियेश प्रदीप शिंदे (८१.५०%)
२) आर्यन अनिल देवघरकर (७२.३३%)
३) जान्हवी सुधीर साळवी (७१.१७%)

या यशस्वी विद्यार्थ्यांचे शेखर निकम, अनिरुद्ध निकम, महेश महाडिक, शांताराम खानविलकर, जयवंत जालगावकर, अशोक जाधव, पुरुषोत्तम खोत, पूर्वा सकपाळ आणि संदेश राऊत यांनी कौतुक केले आहे.

या विद्यार्थ्यांना दीपनंदा बोधे, शारदा अलगुडे, ओंकार मोरे, जीवन गुहागरकर, राशी शिगवण, पूजा देवरुखकर, जुईली पवार, सुप्रिया पवार, सुशांत शिगवण, समीर भोसले, अनुराग पाणीग्रही आणि मनोज सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.