दापोली: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वीरेश्वर विद्यालय विरसईने १०० टक्के निकालाची दैदिप्यमान परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागातील या विद्यालयातील सर्वच्या सर्व १३ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेमध्ये करीना किसन तटकरे हिने ५०० पैकी ४४५ गुण मिळवून ८९ टक्क्यांसह विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. त्यापाठोपाठ केतकी राजेंद्र तांबुटकर हिने ४३८ गुण (८७.६० टक्के) मिळवून द्वितीय क्रमांक, तर लावण्या अनंत फराटे हिने ४१५ गुण (८३ टक्के) मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच तन्वी यशवंत राणे हिने ८२.६० टक्के गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवले.

इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पवन सचिन मासेकर (७० टक्के), सिद्धांत राजेश रेवाळे (६२ टक्के), आर्यन राजेश पवार (६१.२० टक्के), सानवी राजेश राणे (५७.८० टक्के), वेदिका विश्वास राऊत (५७.६० टक्के), जीवन राजेश आंबडस्कर (५७.२० टक्के), पूर्वा प्रकाश महाडिक (५२.४० टक्के), निखिल संतोष खेराडे (४४.८० टक्के) आणि सोहम राजेश महाडिक (४०.८० टक्के) यांचा समावेश आहे.

विद्यालयाच्या या यशामुळे विरसई परिसरामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.