जिल्ह्यात 77 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 2290 वर
रत्नागिरी दि. 10 (जिमाका): काल सायंकाळपासून 77 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2290 झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 4, कळंबणी 1, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर गुहागर येथून 04, कामथे 01, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा 10 अशा 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे
