दापोली : आझाद मैदानात दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी ळी 9.00 वाजता १०० मीटर अंतराची हळू सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा लहान वयोगट व खुला गट अशा दोन गटात होणार आहे.
या स्पर्धेचे वेगळेपण असे आहे की, यामध्ये जो सायकलपटू हळू सायकल चालवत, जमिनीला पाय न टेकता अंतिम रेषा सर्वात शेवटी ओलांडतो तो विजेता ठरतो.
हळू सायकल स्पर्धा
स्थळ: आझाद मैदान ध्वजस्तंभजवळ, दापोली
रविवार, १४ फेब्रुवारी २०२१, सकाळी 9:00 वाजता