रत्नागिरी – शहरा नजीकच्या ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंचपदी सौ. रहमत अलिमियाँ काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. मला कालावधी खूप कमी मिळाला असल्याची जाणीव आहे. तरी सुद्धा झपाट्यानं विकासकार्य करण्याकडे माझा कल राहील, असं नवनिर्वाचित सरपंच रहमत काझी म्हणाल्या.

रहमत काझी आणि अलिमियाँ काझी

पदग्रहण सोहळ्यात उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, अलिमियाँ काझी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी सरपंच रहमत काझी याचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.