जीवन सुर्वे यांचा सन्मान

दापोली- चिपळूण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशनात दापोली शाखेचे शिक्षक नेते जीवन सुर्वे यांची प्राथमिक शिक्षक महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जीवन सुर्वे हे माझ्या दापोली मतदार संघातील असल्याने त्यांचा झालेला सन्मान व त्यांना देण्यात आलेले राष्ट्रीय पातळीवरील पद ही माझ्यासाठी देखील अभिमानास्पद बाब असल्याचे मत ना. योगेशदादा कदम त्यांनी व्यक्त केले.

प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून जीवन सुर्वे यांनी केलेल्या उत्तम कार्याची ही पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याचा राज्यमंत्री आणि मतदार संघाचा हक्काचा माणूस या नात्याने आपण सदैव शिक्षकांसोबत असून प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण शिक्षक संघटनेच्या सदैव पाठीशी असल्याचे स्पष्ट मत ना. योगेश कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीवर कार्याध्यक्षपदी निवड झालेले मंगेश कडवईकर, राज्य प्रतिनिधी सचिन नावडकर, शिक्षक संघ प्रणित जुनी पेन्शन जिल्हाध्यक्ष आनंद रोहे यांचे देखील अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या सत्कार प्रसंगी दापोली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप जालगावकर, दापोली तालुका कोषाध्यक्ष महेंद्र खांबल उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, तालुकाप्रमुख उन्मेश राजे, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या चारुता कामतेकर यांनीही जीवन सुर्वे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*