गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

रत्नागिरीच्या गुहागर आणि लाडघर किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ बहुमान; राज्याच्या पर्यटन क्षेत्रात ऐतिहासिक नोंद

रत्नागिरीच्या गुहागर आणि लाडघर किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ बहुमान; राज्याच्या पर्यटन क्षेत्रात ऐतिहासिक नोंद

रत्नागिरी: पर्यावरणाच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत जगातील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ‘आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग’ सन्मान रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर या दोन समुद्रकिनाऱ्यांना २०२६-२७ या हंगामासाठी जाहीर झाला आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच या आंतरराष्ट्रीय सन्मानाच्या यादीत स्थान मिळाल्याने राज्याच्या आणि विशेषतः कोकणच्या पर्यटन क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. जागतिक पर्यटन नकाशावर यामुळे रत्नागिरीची एक नवी आणि सकारात्मक ओळख निर्माण झाली आहे.

समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन अशा अत्यंत कठोर आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता केल्यामुळे गुहागर आणि लाडघरला हा जागतिक बहुमान प्राप्त झाला आहे.

राज्य शासनाचे विविध विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या योग्य समन्वयातून आणि परिश्रमातून हे यश साध्य झाले आहे.

या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे कोकणच्या निसर्गसंपन्न किनाऱ्यांवर शाश्वत पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी समाधान व्यक्त करत, हा कोकणच्या पर्यटन विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी उदय सामंत यांचा विशेष सन्मान केला.

हा सन्मान रत्नागिरीच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकाचा असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

तसेच, आपल्या समुद्रकिनाऱ्यांना मिळालेली ही जागतिक ओळख भविष्यातही कायम राखत, अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यटनसमृद्ध रत्नागिरी घडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन प्रशासनासह नागरिकांना करण्यात आले आहे.

Blue Flag Beach, Eco Tourism, Guhagar beach, konkan tourism, Ladghar Beach, Maharashtra Tourism, Ratnagiri Tourism, Sustainable Tourism, uday samant

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *