रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोफत वैकुंठ रथाचे मारुती मंदिर नाट्यगृह येथे लोकार्पण करण्यात आले.
दुःखाच्या प्रसंगी कुटुंबांवरील आर्थिक भार कमी व्हावा आणि गरजू नागरिकांना सन्मानपूर्वक अंतिम सेवा मिळावी, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या लोकार्पणावेळी रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांना आवर्जून पुढे बोलावून घेतले आणि त्यांच्या समवेत फीत कापून रथाचे उद्घाटन केले.
कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणारी ही कृती पक्ष संघटनेबद्दल असलेल्या त्यांच्या आत्मीयतेची साक्ष देणारी ठरली.
हा वैकुंठ रथ रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत समर्पित असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

या सेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.या रथासाठी संदीप रसाळ आणि नगरसेविका सुप्रिया रसाळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या रथासाठी संदीप रसाळ आणि नगरसेविका सुप्रिया रसाळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्यांनी रवींद्र चव्हाण व त्यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्याशी समन्वय साधून हा उपक्रम लवकरात लवकर सेवेत उपलब्ध व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले.
या प्रसंगी पक्षाचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरीकरांना मोफत सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण निर्माण केल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

