रत्नागिरी : माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
राजेश सावंत यांच्या निधनानंतर राणे यांनी सावंत कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि या दुःखद प्रसंगी त्यांना धीर दिला.
या सांत्वनपर भेटीवेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, माजी आमदार बाळ माने, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके आणि शहर अध्यक्ष दादा ढेकणे यांचा समावेश होता.
या कठीण काळात संपूर्ण पक्ष सावंत कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा आधार या भेटीदरम्यान देण्यात आला.

