रत्नागिरी : कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टरांचे दोन धीराचे शब्द रुग्णाला खूप मोठा आधार देऊन जात अजित. डॉक्टरांचं महत्त्व किती आहे आणि ते काय करू शकतात हे हजारो लोकांनी या वर्षभरात पाहिलं आहे. रत्नागिरीमध्ये आशीच सेवा बजावणाऱ्या डॉ. मतीन परकार यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. भारत सरकारचे सहाय्यक विदेश व्यापार महासंचालक अश्विन गोळपकर यांनी त्यांच्या कार्याचा कौतुक केलं आहे.

डॉ. मतीन परकार मार्च २०२० पासून जिल्हा रुग्णालय, वूमन्स हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल आणि आता परकार हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. आपले वडील डॉ. अलीमिया परकार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत डॉ. मतीन परकार कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत.

अश्विन गोळपकर यांनी पाठवलेल्या पत्राचं मजकूर पुढील प्रमाणे, मला प्रचंड आनंद होत आहे की, रत्नागिरी डॉक्टर मतीन परकार आणि नर्सिंग स्टाफ निस्वार्थीपणे रुग्णांना सेवा देत आहेत. कोव्हिडच्या काळात कोरोना आटोक्यात यावा यासाठी ते खूप मेहनत करत आहेत. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी ते युद्धपातळीवर लढा देत आहेत. महत्वाची औषधं, ऑक्सिजन किंवा इतर महत्वाच्या गोष्टी करण्यामध्ये ते जराही कमी पडत नाहीयेत. तुमची ही सेवा अशीच सुरू ठेवा, देव तुम्हा सर्वांबरोबर असेल.

सहाय्यक विदेश व्यापार महासंचालक अश्विन गोळपकर यांच्या वडिलांनी देखील डॉक्टर मतीन परकार यांच्याकडे उपचार घेतले व डॉक्टरांची आपल्या कामाप्रती असणारी निष्ठा पाहून अश्विन गोळपकर यांनी पत्राद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत.

आपल्या कार्याची जेव्हा कोणी अशी दाखल घेतं तेव्हा लढण्याचं बळ मिळत, अशी प्रतिक्रिया डॉ. मतीन परकार यांनी दिली. रूग्ण लवकरात लवकर बरा होऊन आपल्या घरी कसा जाईल यासाठी आम्ही जीव तोडून काम करत आहोत. आताचा काळ हा अतिशय कठीण आहे, पण तो ही निवळेल असा अशावाद डॉ. मतीन परकार यांनी व्यक्त केला. लोकांनी हिमतीनं या प्रसंग सामोरं जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.