दापोली : शहरातील बाजारपेठेत असलेल्या गजानन लॉज येथे वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवून त्यातून मिळणाऱ्या पैशावर उपजीविका केल्याप्रकरणी संशयित विरेंद्र काशिनाथ वेल्हाळ याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 8 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचं आदेश न्यायालयानं दिले आहेत.
     दापोली शहरातील गजानन लॉज येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती रत्नागिरी पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध विभागाला मिळाल्यावर त्यांनी दापोली पोलिसांच्या मदतीने ४ जुलै रोजी दुपारी 3 च्या सुमारास डमी गिऱ्हाईक या लॉज मध्ये पाठवले या डमी ग्राहकांकडून या लॉज मधील संशयित विरेंद्र काशिनाथ वेल्हाळ यांने दोन हजार रुपये घेतले व त्याला लॉज मधील ज्या खोलीत महिला बसली होती तिकडे जाण्याचा इशारा केला.

तेवढ्यात पंचांसमक्ष पोलीस पथक तेथे पोहोचले व त्यांनी पीडित महिला व संशयित विरेंद्र वेल्हाळ यांना ताब्यात घेतले. विरेंद्र वेल्हाळ याची झेडती घेण्यात आली तेव्हा डमी गिऱ्हाईकाने दिलेले दोन हजार रुपये एक मोबाईल असा 7000/- हजार रुपये किंमततिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या दोघांनाही दापोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले तेथे या पीडित महिलेकडे चौकशी करण्यात आल्यानंतर संशयित विरेंद्र वेल्हाळ हा लॉज मध्ये वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका करीत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यावर संशयित विरेंद्र वेल्हाळच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली. पीडित महिलेला सोडून देण्यात आले.

या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे दापोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.