Cov

रत्नागिरी : कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या माहितीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयानं हेल्प डेस्क सुरू आहे. त्याचबरोबर रूग्णालयात न येताही आता केवळ इ-मेलवर माहिती मिळवता येऊ शकणार आहे.

 रत्नागिरी येथील आरटी-पीसीआर लॅबमध्ये तपासण्यात आलेले स्वॅब चाचणीचे निगेटिव्ह अहवाल संबधितांच्या रजिस्टर्ड क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठविले जातात. पण तपासणीचा अहवाल हवा असेल तर जिल्हा रूग्णालयात यापूर्वी यावं लागत होतं. आता कोरोना तपासणीचा अहवाल हवा असल्यास संबधितांनी प्रत्यक्ष न येता covidreportapp@gmail.com या ईमेल वर विंनती अर्ज करावा.

जिल्हा रुग्णालयाकडून कोव्हीड-19 रुग्णांच्या माहितीकरिता हेल्प डेस्क सुरु करण्यात आलेला आहे. हेल्प डेस्कसाठी 02352-226060 या क्रमांकवर दररोज सकाळी 09.00 ते रात्री 09.00 या वेळेत संपर्क साधता येऊ शकेल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.