जिल्ह्यात पाच नवीन कोरोना रुग्ण, तर दापोली पिसई येथील एकाचा मृत्यू

corona update
Corona

काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 05 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे

पायरवाडी कापसाळ ता.चिपळूण-1 (मुंबई प्रवास इतिहास)

शिवाजीनगर जुना फणसोप ता. रत्नागिरी-1 (विशाखापट्टण प्रवास इतिहास)

धामेली कोतवडे ता. रत्नागिरी-1 (आशा वर्कर)

पोलीस वसाहत ता. रत्नागिरी-1 (पोलीस कॉन्स्टेबल)

गोडावून स्टॉप ता. रत्नागिरी-1 (स्टाफ नर्स)

जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्ण मु.पो. पिसई कुंभारवाडी ता. दापोली येथील असून त्याचे वय 64 आहे. त्याचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. रुग्णाला मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

आज कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण येथून एक रुग्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

*आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे*
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -499
बरे झालेले रुग्ण -364
मृत्यू-24
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-111+1

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*