दापोली शिक्षण संस्था संचालित ए. जी. हायस्कूलमध्ये इयत्ता ११ वी व १२ वीच्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सीएस (कंपनी सेक्रेटरी), सीए (चार्टर्ड अकाउंटंट) आणि सीएमए (कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट) या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या फाउंडेशन कोर्सचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले ए.जी. हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि दापोली जालगाव बाजारपेठ येथील चार्टर्ड अकाउंटंट ऋषिकेश शेठ यांनी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचे महत्त्व, करिअरच्या संधी आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
संस्थेचे संचालक श्रेयस काकिर्डे यांनी शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक अभ्यासक्रमांचा अभ्यास केल्यास भविष्यात वित्त, लेखाशास्त्र, कंपनी व्यवस्थापन व उद्योग क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवता येते, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, संचालक अशोक जाधव आणि एका महिला संचालिका यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मुख्याध्यापक शरद कांबळे, ज्येष्ठ शिक्षिका आणि इतर शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश शिंत्रे यांनी केले, सूत्रसंचालन एका महिला शिक्षिकेने केले, तर आभार प्रदर्शन एका महिला शिक्षिकेने मानले.

