साखलोली शिवाजीनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात मोटरसायकलस्वार जखमी

सख्लोली शिवाजीनगर रस्त्यावर बिबट्याने १५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल वरून प्रवास करणारे ऋषभ दाभोळकर राहणार असोंड व अमर लांजेकर राहणार शिवाजीनगर यांच्यावर पाठलाग करत हल्ला केला यामध्ये ते जखमी झाले असुन तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच वनआधिकारी यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर…
ना. उदय सामंत – उधोग मंत्री

त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन

भारतीय अब्जाधीश, शेअर व्यापारी आणि गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे. बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दापोलीत पत्रकारांच्यावतीने वृक्षारोपण

देशात साजऱ्या होणाऱ्या आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाला पाठिंबा देण्याकरिता दापोली येथील पत्रकारांच्यावतीने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण नुकतेच उत्साहात पार पडले. वृक्षारोपण करून स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना दापोलीतील पत्रकारांच्यावतीने अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली

दापोलीत तिरंगा रॅली उत्साहात

विद्यार्थ्यांचे तिरंगा पथक, राष्ट्रीय पुरुष, क्रांतिकारक, देशभक्त, वीर पुरुष व महामानव यांच्या विविध वेशभूषा, तसेच राष्ट्रभक्तिपर सुरेल आवाजातील समुहगीत तिरंगा रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. दापोली बस स्थानक, बाजारपेठ, केळसकरनाका, साने गुरुजी उद्यान, शिवाजी चौकामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग दर्शवून हर घर तिरंगा आणि भारत मातेच्या जयघोषाने सर्व वातावरण देशभक्तिपर केले.

रामदास कदम यांचा ‘शिवसेना नेते’ पदाचा राजीनामा

मुंबई : कोकणाची मुलुख मैदानी तोफ माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र […]

राकेश कोटिया गोपाळकृष्ण पतसंस्थचे पाचव्यांदा अध्यक्ष

सुधीर तलाठी यांची उपाध्यक्षपदी निवड राकेश कोटिया यांची श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राकेश कोटिया यांनी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी कायमच प्रयत्न केले […]

अनंत गिते आणि सुर्यकांत दळवी 7 वर्षांनी एका व्यासपीठावर

दापोली : मुंबई दादर येथे  दापोलीतील मुंबईवासिय शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते  दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे तब्बल ७ वर्षानंतर एकत्र […]

मंडणगड किल्ल्यावरील झाडी झुडपात आणि दगडांमध्ये गाडलेले “मुख्य प्रवेशद्वार” प्रकाशात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील ता. मंडणगड येथील मंडणगड किल्ल्यावर वर्षोनुवर्षे दगड व झाडी झुडपात लुप्त झालेला “मुख्य प्रवेशद्वार” अखेरीस प्रकाशात आला. सह्याद्री प्रतिष्ठान मंडणगड विभागातील सदस्यांनी गडाच्या दि.१० जुलै २०२२ रोजी अभ्यास मोहिमेदरम्यान गडाच्या पूर्वेकडील बाजूस घडीव कोरीव दगड आणि दरवाजाची तुटलेली कमानीचे खांब त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याची पाहणी करून ते दगड बाजूला केले असता. गडाचा मुख्य प्रवेशद्वार आणि जांभ्या दगडात बांधलेली पहारेकऱ्यांची देवडी निदर्शनास आली. हा गडाचा मुख्य प्रवेशद्वार असून या ठिकाणी राजमार्ग ही आहे. साधारण ८ फूट लांब आणि ४ फूट उंच प्रवेशद्वार असून त्याचा घेरा/देवड्याचा परिसर २१ X २१ फूट लांब ११ फूट रुंद एवढं आहे. प्रवेशद्वारापासून खाली ९० फूट एवढा राजमार्ग परिसर असून त्यावर ढासलेल्या तटबंदीचे चिरे पडले आहेत.