ॲड. स्वप्निल खोपकर यांचा जबरदस्त युक्तिवाद

दापोली (प्रतिनिधी) : रामचंद्र आंबेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी अशोक दाभिळकर आणि इतर चौघां विरोधात दापोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ॲड. स्वप्निल खोपकर यांच्या जबरदस्त युक्तीवादामुळे अशोक दाभिळकर यांना दापोली कोर्टाने आरोप मुक्त केलं आहे.

पूर्वीच्या जागा जमिनीच्या वादातून फिर्यादी रामचंद्र आंबेकर आणि अशोक दाभिळकर यांच्यात वाद होता. त्यातूनच हा सगळा वाद निर्माण झाला होता. या मारहाणी प्रकरणी दापोली पोलीसांनी तपास करून ४ आरोपींच्या विरुद्ध आरोपपत्र दापोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे दाखल केले.

या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासले गेले.  या मध्ये दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी देखील होते.

आरोपी यांचे तर्फे तरुण व सुप्रसिद्ध ॲड. स्वप्निल खोपकर यांनी काम पाहिले. या केस कामी पोलीसांनी एक लाकडी दांडा जप्त केला होता. वैद्यकीय अधिकारी यांनी सरतपासणी दरम्यान या दांड्याने फिर्यादीला मारहाण होऊ शकते, असे मत नोंदविले होते.

परंतु ॲड. खोपकर यांनी घेतलेल्या उलट तपासणी दरम्यान जप्त असलेल्या दांड्याने फिर्यादी सांगत असलेल्या गंभीर जखमा होऊ शकत नाहीत, अशी कबुली वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. अखेर ॲड. स्वप्निल खोपकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी यांची निर्दोष मुक्तता केली.

वकिलीतील उभारता तारा ॲड. स्वप्निल खोपकर

ॲड. स्वप्निल खोपकर

ॲड. स्वप्निल खोपकर यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून जात वकिलीचं शिक्षण घेतलं. कॉलेज काळापासूनच एक अभ्यासू विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं.

ॲड. स्वप्निल खोपकर यांनी आपल्या हिमतीवर आपल्या जिद्दीवर आज वकिलीक्षेत्रात भरारी घेतली आहे. विश्वासार्थ जपत वकिली कशाप्रकारे करता येऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ॲड. स्वप्निल खोपकर. तरुण वयातच वकिलीची चांगली समज त्यांच्यामध्ये दिसून येते. भविष्यात समाजाकडला  ॲड. स्वप्निल खोपकर यांच्याकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. त्यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!