दापोली : शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलच्या विद्याभारती विभागाने नुकत्याच अंबरनाथ येथे संपन्न झालेल्या कोकण प्रांत खेलकुद स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन करत आपली दमदार परंपरा कायम राखली आहे.
या क्रीडा स्पर्धेत विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्राविण्य दाखवले असून, १७ वर्षाखालील बॅडमिंटन मुलांच्या स्पर्धेत वरद वैद्य, अमोघ जोशी आणि स्नेहराज राठोड यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मल्लखांब १४ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत प्रज्ञेश शिंदे याने चतुर्थ क्रमांक मिळवला, तर १७ वर्षाखालील मुलांच्या मल्लखांब स्पर्धेत स्वराज मांजरे याने प्रथम क्रमांक पटकावला. मल्लखांब १७ वर्षाखालील मुलींच्या गटात समृद्धी धाडवे हिने प्रथम क्रमांक, वेदा खंकाळ हिने द्वितीय क्रमांक आणि ऋतुजा पवार हिने तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच १९ वर्षाखालील मुलींच्या मल्लखांब स्पर्धेत पल्लवी भुवड हिने प्रथम क्रमांक संपादन केला. बुद्धिबळ १४ वर्षाखालील मुले गटात वेदांत भागवतने प्रथम क्रमांक, अर्जुन वालावलकरने चतुर्थ क्रमांक आणि आराध्य पास्तेने सातवा क्रमांक मिळवला.
बुद्धिबळ १४ वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत सिया कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक तर तन्मया डोंगरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. सांघिक खेळांमध्येही विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी केली असून, १७ वर्षाखालील कबड्डी मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला, ज्यामध्ये रुद्र जाधव, अवधूत शिगवण, स्वराज जोशी, साई भांबीड, सागर पवार, निर्वाण गोरीवले, ओम वारणकर, जय पांगारकर, करण भैरमकर, सार्थक भांबीड, विराज दाभोळकर आणि सर्वेश पुलेकर यांनी सहभाग घेतला.
१४ वर्षाखालील कबड्डी मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला, ज्यामध्ये सार्थकी दाभोळे, सई पाते, वनश्री पाष्टे, काव्या झगडे, स्वरा होगले, श्राव्या कुंबेटे, सुरभी परांजपे, सानवी दुबळे, सिया धोत्रे, सावी भोसले, स्वरा मोरे आणि अस्मि गोवले यांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत बॅडमिंटन, बुद्धिबळ व मल्लखांब मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची खेळकुद विद्याभारती पश्चिम क्षेत्र विभागीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रमुख शैलेश मिसाळ, विजय भुवड, क्रीडा शिक्षक प्रथमेश दाभोळे, आकांक्षा अस्वले, प्रिया पास्ते व ऋतुजा बेर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे नियामक मंडळ अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी, शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, सदस्या स्मिता सुर्वे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक मगदूम एस.आय., पर्यवेक्षक अनिल पेठकर, पर्यवेक्षिका सोनाली मेहंदळे, विद्याभारती समन्वयक स्वरदा थोरात तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्गाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

