पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 683 त्यापैकी 460 बरे झाले, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 67% आहे.

 

रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 03 –जिल्हयात काल सायंकाळपासून 22 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 683 आहे. जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 11 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले त्यामुळे बरे झालेल्याची संख्या 460 झाली आहे.

काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 22 नवीन पॉझिटिव्ह रुग्णपैकी 20 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे विवरण असे

चिपळूण येथील 11 रुग्ण उपकेंद्र कामथे, चिपळूण येथे ॲडमिट
राजापूर येथील 1, रत्नागिरी तील 4 आणि लांजा येथील 2 रुग्ण जिल्हा कोव्हीड रुग्णालयात ॲडमिट
खेड येथील 2 रुग्ण कळंबणी उपकेंद्र येथे ॲडमिट
सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 197 आहे. आज एस.पी बंगला, रत्नागिरी, मौजे खेडशी, मौजे गणेशगुळे, मौजे वेळवंड ही चार क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

तसेच मौजे पूर, ता.संगमेश्वर, मौजे बामणोली, ता. संगमेश्वर, मौजे मानसकाकेंड, ता. संगमेश्वर, मौजे धामापूर तर्फे संगमेश्वर, ता. संगमेश्वर,मौजे मुरडव, ता. संगमेश्वर भागात कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सीमा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.

 

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे

एकूण पॉझिटिव्ह – 683
बरे झालेले – 460
मृत्यू – 26
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 197

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या 49 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये, दापोली मध्ये 6 गावांमध्ये, खेड मध्ये 3 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 12 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 37, कोव्हीड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 3, कोव्हीड केअर सेंटर, पेंढाबे, चिपळूण – 2, कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल – 6, केकेव्ही, दापोली – 20 असे एकूण 69 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 16 हजार 112 इतकी आहे.

9 हजार निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 10 हजार 163 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 9 हजार 997 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 683 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 9 हजार 279 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 163 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 163 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 02 जुलै 2020 अखेर एकूण 1 लाख 64 हजार 787 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 89 हजार 118 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि. 03 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे. यानंतर अहवाल प्राप्त झाल्यास यात बदल होवू शकतो. पुढील अपडेट मध्ये सकाळी 12 पूर्वी याची माहिती देण्यात येईल.