शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

भाजप आध्यात्मिक प्रकोष्ठ प्रदेश सहसंयोजकपदी कोकणातून अभिजीत घनवटकर आणि मोहन म्हात्रे यांची नियुक्ती

भाजप आध्यात्मिक प्रकोष्ठ प्रदेश सहसंयोजकपदी कोकणातून अभिजीत घनवटकर आणि मोहन म्हात्रे यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आध्यात्मिक प्रकोष्ठाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये कोकण विभागाला विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

रायगड येथील मोहन म्हात्रे यांची कोकण विभागासाठी तर अभिजीत विनायक घनवटकर यांची ठाणे-कोकण विभागासाठी प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने २४ नोव्हेंबर २०२६ रोजी हे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले असून, या सर्व नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

कोकण विभागातील आध्यात्मिक क्षेत्राशी निगडित घटकांना पक्ष संघटनेशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी मोहन म्हात्रे आणि अभिजीत विनायक घनवटकर यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यासोबतच राज्यभरातील इतर विभागांसाठीही नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, आध्यात्मिक प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजकपदी नाशिकचे तुषार भोसले यांची नियुक्ती झाली आहे.

इतर विभागांमधील प्रदेश सहसंयोजकांमध्ये मराठवाड्यासाठी नांदेडचे राजेश देगलूरकर आणि छत्रपती संभाजीनगरचे रामराव शेळके, पश्चिम विदर्भासाठी बुलढाण्याचे प्रकाश जवंजाळ, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिकचे संजयनाना धोंडगे, पूर्व विदर्भासाठी चंद्रपूरच्या शिल्पा देशकर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुण्याचे शिवाजी भागवत यांचा समावेश आहे.

या नव्या नियुक्त्यांमुळे राज्यासह कोकण विभागात भाजपच्या आध्यात्मिक प्रकोष्ठाचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यास बळ मिळणार आहे.

Abhijit Ghanwatkar, BJP Maharashtra, BJP Spiritual Cell, konkan news, Maharashtra Politics, Mohan Mhatre, Raigad Politics, ravindra chavan, Thane Konkan, Tushar Bhosale

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *