शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶

रत्नागिरीतील प्रभाग १५ मधील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

रत्नागिरीतील प्रभाग १५ मधील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १५ मधील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या समस्येची गंभीर दखल घेत प्रभागातील भाजपा नगरसेविका वर्षा परशुराम ढेकणे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.

या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रभागातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी गेल्या महिनाभरापासून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी सूचना देण्यात येत होत्या.

मात्र, आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याचे कारण वारंवार पुढे केले जात असल्याने प्रत्यक्ष काम सुरू झाले नव्हते. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

रस्त्यांवरील या खड्ड्यांमुळे वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे वर्षा ढेकणे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

निवेदनाची तातडीने दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला प्रभाग क्रमांक १५ मधील रस्त्यांची त्वरित पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच आवश्यक साहित्य उपलब्ध करून खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासन सकारात्मक असून समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानले असून, प्रत्यक्ष काम लवकरात लवकर पूर्ण होऊन प्रभागातील नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

civic issues, Local Administration, Maharashtra News, Potholes Repair, Ratnagiri Municipal Council, ratnagiri news, Road Safety, Varsha Dhekane, ward 15

माय कोकण टीम

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *