दापोली : तालुका क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल खेळात १४ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये यु. ए. दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूल, दापोलीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले आहे.
या अटीतटीच्या सामन्यात अब्दुल रज्जाक मजिद सहीबोले, रेहान इम्रान चाऊस, माझ नदीम कोंडेकर, अरसलान सुलतान मुजावर, शैख्वान महम्मद रखांगे, मोहम्मद उजैर फैचाज सारंग, मुआविया फैजल पटेल, फौजान दानिश हुसैन, नौमान सरताज कोतवालकर, झोहैद शाहनवाज मुकादम, झफीर अब्दुल मन्नान अंतुले, जुहेर हुसैन मुरूडकर, उजैर मुस्तकीम शादुल्ला, इजान राशीद चेलकर, अख्यान खलील पावसकर, अब्दुल समद फैसल पटेल आणि अहमद अब्दुल समद पटेल या सर्व खेळाडूंनी अचूक सांघिक खेळीचे प्रदर्शन घडवले.
कर्णधार पदाची धुरा सांभाळणाऱ्या जुहेर हुसैन मुरूडकरने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्रत्येकी दोन गोल नोंदवले, तसेच अंतिम फेरीच्या अटीतटीच्या पेनाल्टी लढतीत पाच गोल अडवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि संघाला जेतेपदाचा मान मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
या दैदिप्यमान यशाबद्दल खेळाडूंचे शाळेचे चेअरमन खालीद अब्दुल्ला रखांगे, शाळा समितीचे सदस्य नाझीम उस्मान काझी, संस्थेचे सेक्रेटरी इकबाल परकार, कौन्सील चेअरमन लियाकत रवांगे, मार्गदर्शक क्रीडा शिक्षक वसिऊल्लाह दरवाजकर, मुख्याध्यापिका नुजहत मुस्तकीम रखांगे आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अमरा अलीम रखांगे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
तालुका स्पर्धेतविजेतेपद मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या विजयी संघाला आगामी लढतींसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

