दापोली : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे आयोजित तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत नॅशनल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी दयान अनिस सहीबोले याने ५६ किलो वजनी गटातील १७ वर्षे वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे.

स्पर्धेदरम्यान दयानने आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली असून त्याच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दयान हा नॅशनल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील लिपिक अनिस सहीबोले याचा मुलगा असून त्याला शिक्षक तन्वीर अराई आणि जमीर जमादार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

त्याच्या या यशाबद्दल मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, स्कूल कमिटी अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, मुख्याध्यापक अय्युब मुल्ला तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले असून येत्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.