दापोली : शहरातील उद्योजक प्रमोद हसमुख पांगारकर यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.
यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष तथा नगरसेविका जया साळवी, भाऊ इदाते, संदीप केळकर, अतुल गोदकर, वैशाली इदाते, वैष्णवी वेल्हाळ, बाबू लिंगावळे, रोहित शिंदे आणि धीरज पटेल यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमोद पांगारकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवत पक्षात सहभाग घेतला.
या पक्षप्रवेशामुळे दापोली शहरातभारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बाजू अधिक बळकट होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे.

