दापोली : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली चा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेत प्रशालेतील सर्वच्या सर्व म्हणजे ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रशालेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जिया जमीर जमादार हिने ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर शिफा जमीर चिपळूणकर ९१.६० टक्के गुण मिळवून द्वितीय आणि नौफ शौकत कोंडविलकर ८८.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नजीर पठाण, गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटीचे अध्यक्ष आरिफ मेमन आणि संस्थेच्या इतर सदस्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

यासोबतच मुख्याध्यापक अय्युब मुल्ला आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात आले आहे.