दापोली: सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयाने आपली यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत विद्यालयातील सर्वच्या सर्व ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातून मैथिली मुकेश महाडिक 88.80 प्रथम क्रमांक, अनुज अनिल देवघरकर 86.20 द्वितीय क्रमांक, अमृता वसंत गायकवाड 84.40 तृतीय क्रमांक आणि मंथन नरेश सरकरे 84.20 चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.

उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून, ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

या यशाबद्दल मुख्याध्यापक संदेश राऊत, शिक्षक नझिर मुसा, पांडुरंग शिंदे, समीर भोसले आणि भरत गोताड यांचे कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समिती अध्यक्ष जयवंत जालगावकर, अशोक जाधव, विजयकुमार खोत आणि सरपंच पूर्वा सकपाळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.