दापोली: ए. जी. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, दापोली या विद्यालयाचा फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

विद्यालयाने यावर्षीही आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली असून विज्ञान शाखेचा निकाल ९८.१३ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९६.१५ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेतून एकूण ३२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेत १५६ विद्यार्थ्यांपैकी १५० विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. दोन्ही शाखांचा एकत्रित निकाल ९७.४८ टक्के इतका लागला आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांची कामगिरी:
विज्ञान शाखेत रोहित विकास शिंदे याने ५४० गुण (९०.००%) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तन्मय दिनेश शेवडे ५३३ गुणांसह (८८.८३%) दुसऱ्या स्थानावर, तर आर्या नितीन मुंडेकर ५१३ गुणांसह (८५.५०%) तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय वरून गणेश माने, अमित शिवकुमार मेहता, गौरव दीपक गुरव आणि ओम मधुकर बागुल यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

वाणिज्य शाखेत ५४८ गुण (९१.३३%) मिळवून स्वरा शैलेश कोटिया हिने प्रथम क्रमांक मिळवला. पारस राजेश राजवडकर याने ५२० गुण (८६.६७%) मिळवत द्वितीय, तर संयम नरेंद्रकुमार जैन याने ५१४ गुणांसह (८५.६७%) तृतीय क्रमांक पटकावला. गणेश राजेश शिंदे, सोहम संतोष खेडेकर, कमलेश सचिन तलाठी आणि ऋग्वेद संदीप राऊत हे देखील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत आघाडीवर आहेत.

या यशाबद्दल नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रसाद करमरकर, कार्यवाहक विनोद जोशी, संचालक मंडळ, शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक अर्जुन घुले, पर्यवेक्षक अनिल पेटकर आणि मगदूम एस. आय. यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.