दापोली : भारत सरकार केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) दापोलीतील नॅशनल हायस्कूलची विद्यार्थिनी तहरीम हसरत सौतिरकर हिने घवघवीत यश संपादन केले आहे.

या परीक्षेमध्ये तिने खुल्या प्रवर्गातून १२२ गुण मिळवत रत्नागिरी जिल्ह्यात ७२ वा क्रमांक पटकावला आहे.

तहरीमच्या या यशाबद्दल मुस्लिम एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार, कॉलेज कमिटीचे अध्यक्ष आरिफ मेमन आणि मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

तसेच तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक रिजवान मणियार, सलमान मोमीन आणि नजीफा साठी यांचेही कौतुक करण्यात येत आहे.

या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.