मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सागरी किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सोयीसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेंतर्गत रत्नागिरीच्या समुद्रकिनारी ६ ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट बांधले जाणार आहेत.

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टरचे ९ युनिट आणि चेंजिंग रूमच्या एकूण ९ युनिटसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

तसेच, मांडवी बीच येथे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट युनिटचे उद्घाटन ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

कोकणातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटची मागणी भाजपा महिला मोर्चाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे आणि दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती.

रत्नागिरीच्या भाट्ये बीच, गणपतीपुळे बीच, गणेशगुळे बीच, वेळणेश्वर बीच (ता. गुहागर), लाडघर बीच (ता. दापोली) व मुरुड बीच (ता. दापोली) येथे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर युनिट आणि चेंजिंग रूम युनिट बांधण्यात येणार आहेत.

यापैकी मांडवी बीच येथील सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट युनिट आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वैयक्तिक खर्चातून उभारले जात आहे, ज्याचे उद्घाटन ९ एप्रिल रोजी होणार आहे.

उर्वरित ६ ठिकाणच्या सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टरचे १३ युनिट आणि चेंजिंग रूमच्या १३ युनिटसाठी कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.

या ९ युनिटसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या युनिट्सच्या मंजुरीसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांचेही सहकार्य लाभले.

कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर दररोज हजारो पर्यटक येत असतात, परंतु किनाऱ्यांवर शौचालय किंवा चेंजिंग रूमची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते.

पर्यटकांची ही गैरसोय दूर व्हावी आणि त्यांना चांगली सोयीसुविधा मिळावी, या दृष्टिकोनातून भाजपा महिला मोर्चाच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी समुद्रकिनारी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट असावेत अशी संकल्पना मांडली.

त्यांनी याबाबत कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरील ६ ठिकाणांसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टरचे १३ युनिट आणि चेंजिंग रूमच्या १३ युनिटला मंजुरी देऊन ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

कोकणातील विकासकामांची गती वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट बांधण्याची मागणी वर्षा ढेकणे, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सचिव परशुराम ढेकणे, शिल्पा मराठे आणि राजेश सावंत यांनी रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली होती.

रत्नागिरीच्या भाट्ये बीच, गणपतीपुळे बीच, गणेशगुळे बीच, वेळणेश्वर बीच, लाडघर बीच व मुरुड बीच येथे सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट विथ बायो डायजेस्टर युनिट आणि चेंजिंग रूम युनिटच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.