दापोली : कुणबी सेवा संघ, दापोली संचालित नवभारत छात्रालय आपल्या ९९ वर्षांच्या अखंडित परंपरेला पुढे नेत भाजीपाला बियाणे पाकिटांचे मोफत वाटप करत आहे.
या उपक्रमाचा उद्देश सामुदायिक लागवड आणि घरगुती बागायतीला प्रोत्साहन देणे हा आहे.
या बियाणे पाकिटांमध्ये पडवळ, कारली, भोपळा, भेंडी, काकडी, शेवळा आणि दुधी भोपळा यांसारख्या विविध भाज्यांच्या मर्यादित बियाण्यांचा समावेश असेल.
गावातील छोटे गट आणि वाडी/मंडळांनी एकत्रितपणे या बियाणे पाकिटांसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. हा उपक्रम प्रामुख्याने परसबागेत लागवड करणाऱ्यांसाठी आहे.
बियाणे वाटपाच्या वेळी लाभार्थ्यांना लागवड तंत्राबद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनही केले जाईल. तसेच, लागवडीतून पुढील वर्षासाठी बियाणे तयार करणे अपेक्षित आहे.
बियाणे पाकिटे १० मे २०२५ पासून उपलब्ध होतील. पाकिटांची संख्या मर्यादित असल्याने, प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
इच्छुक व्यक्ती आणि गटांनी आजच आपली नोंदणी करावी. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
- हरिश्चंद्र कोकमकर : (9428499079)
- प्रा. प्रभाकर शिंदे : (9422427887)
- डॉ. प्रमोद सावंत : (9420718141)