रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिह्यामध्ये कोरोना रूग्णांचा आकडा आता 484 वर पोहोचला आहे. यात दिलासादायक गोष्ट म्हणजे 349 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोनामुळे आता पर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 116 एवढी आहे.
आज काडवली (संगमेश्वर) येथील 2, गोळप (रत्नागिरी) इथला 1,
रत्नागिरी ओसवालनगर इथं 1, गणपतीपुळे 1, चिपळूण निवळीमध्ये 1,
साळवीवाडी (असुर्डे) 1 आणि चिपळूणमधील खांदाटपाळीमध्ये 1 रूग्ण पॉझिटिव्ह सापडला आहे.
दरम्यान जिल्हा कोव्हीड रुग्णालयामध्ये 2 रुग्णांचा मृत्यु झाला. यामध्ये कापडगाव येथील 53 वर्षीय पुरुष रुग्णाला मधुमेहाचा आजार होता. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले होते. तर चिपळूण तालुक्यातील भिले (कुंभारवाडी) येथील एका महिला रुग्णांलाही (वय-70 वर्षे) मधुमेहाचा आजार होता. त्यांना महिला कक्षात ठेवण्यात आलेले होते.
कोरोनाचं संकट टळलेलं नाहीये. लोकांनी सर्वतोपरी काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या हळू हळू वाढत आहे. लोकांनी मास्क न वापरता रस्त्यावर बिंधास्तपणे फिरणं बंद केलं पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे.