दापोली : कोरोनाच्या पर्वश्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करत सर्व कार्यालये सुरु आहेत. आज सोमवारी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नसताना दापोली नगरपंचायतीचा शटर बंद का? असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
माय कोकणला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भूमी अभिलेख कार्यालयातील एका व्यक्तीमुळे ज्याला कोरोना असल्याचा संशय आहे, तो दापोली नगर पंचायतीत आला होता. त्यामुळे त्याचा अहवाल जोपर्यंत येत नाही तो पर्यंत खबरदारीची उपाययोजना म्हणून नगरपंचायतीचं मुख्य शटर बंद करण्यात आला आहे.
कोरोनाची भीती सध्या शहरामध्ये कोणालाही दिसत नाहीये, अनेक जण मास्क शिवाय फिरत आहेत. बिनधास्तपणे गर्दी करत आहेत. कोरोनाचा वाढत प्रसार लक्षात घेता सध्या नागरिकांनी प्रचंड जागरूक असं आवश्यक आहे. कोरोनाशी मुकाबला करायचा असेल तर योग्य ती खबरदारी घेऊनच लोकांनी वागायचं, वावरायचं आहे.