चेन्नई: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर सत्तासंघर्षाला वेग आला असून, सी. जोसेफ विजयच्या नेतृत्वाखालील तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने सरकार स्थापनेसाठी १२० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
२३४ सदस्यसंख्या असलेल्या तमिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १०८ जागा जिंकून टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
व्हीसीके आणि आययुएमएल या पक्षांनी टीव्हीकेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. टीव्हीके नेते आधव अर्जुना यांनी चेन्नईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
विदुथलै चिरुथैगल कात्ची (व्हीसीके) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययुएमएल) या दोन्ही पक्षांनी विजयला पाठिंबा देण्याचे. आश्वासन दिले आहे.
विजय दोन विधानसभा मतदारसंघातून निवडून आला असून, त्याला एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
यामुळे टीव्हीकेचे स्वतःचे संख्याबळ १०७ वर येईल. मात्र, पाठिंबा देणाऱ्या मित्रपक्षांमध्ये काँग्रेसचे ५ आमदार, तर सीपीआय, सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययुएमएल या पक्षांच्या प्रत्येकी २ आमदारांचा समावेश आहे.
या मित्रपक्षांच्या १३ आमदारांच्या जोरावर टीव्हीकेने बहुमताचा आकडा पार केल्याचा दावा केला आहे.

