दापोलीच्या भोपणमधील 6 वर्षांची चिमुरडी बेपत्ता

दापोली: दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मोहल्ला येथून नुसेबा हनीफ सहीबोले (वय – सहा) ही मुलगी काल दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास बेपत्ता झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल १२ मार्च रोजी दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास भोपण मुस्लिम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ मोहम्मद सहीबोले हे दोघेही सायकल फिरवीत असता सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवण्यास घराकडे गेला. त्यावेळी नसेबा तेथेच उभी होती.

मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कोठेही आढळली नाही, म्हणून घरातल्या पालकांसह सर्वांनी गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली.

मात्र आजपर्यंत कोठेही नुसेबा आढळून आली नाही. नुसेबा हरवल्याची तक्रार पोलीस स्थानक दाभोळ येथे नोंदविण्यात आल्याची माहिती, भोपणचे पोलीस पाटील संजय खळे यांनी दिली. पोलीस तपास सुरू आहे.

मात्र बालिका हरवण्याचे प्रकार दापोली तालुक्यात वारंवार होऊ लागल्याने तालुक्यातील समुपदेशकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

या मुलीबद्दल कोणाकडे काही माहिती उपलब्ध असेल तर त्यांनी साजिद साहिबोले (8879836430) यांना संपर्क करण्याचं आवाहन पालकांनी केलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*