ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आगामी निवडणुकांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहेपण ओबीसी आरक्षणासाठी निवडणूक पुढे ढकलण्याची राज्य सरकारची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे. कारण 21 डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. ओबीसी आरक्षित जागांवर स्थगित झालेली निवडणूक 18 जानेवारीला होणार आहे. तसेच या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकत्रित 19 जानेवारीला होणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. आधी ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या प्रभागात खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार असून राज्य सरकारनं या निवडणुका पुढे ढकलण्याची केलेली विनंती आयोगानं फेटाळली आहे.
सरकारनं निवडणुका पुढे ढकलण्याची केलेली विनंती आयोगानं फेटाळली
21 डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.
Similar Posts
View All
दापोलीत नारळ काढताना विजेचा धक्का बसून उंबर्लेच्या पोलीस पाटलाचा मृत्यू
कोयनेचे पाणी मुंबईला वळविण्यास शौकत मुकादम यांचा तीव्र विरोध; समुद्राचे पाणी गोडे करण्याचा सल्ला
दापोलीत महिला व पुरुष मंडळांसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन
रत्नागिरीतील ‘जमावबंदी हटाव’ मागणीला ॲड. बंटी वणजू यांचा पाठिंबा
महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या अशासकीय सदस्यपदी रत्नागिरीतील परशुराम उर्फ दादा ढेकणे यांची निवड

Leave a Reply