साखरपा गावच्या तन्वी कोलतेने मारली बाजी; बिग बॉस मराठी ६ च्या विजेतेपदावर कोरले नाव

मुंबई : १०० दिवसांचा थरार आणि अटीतटीच्या लढतीनंतर अखेर ‘बिग बॉस मराठी सीजन ६’ चा महाविजेता मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची कन्या तन्वी कोलते हिने या पर्वाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.

१९ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात तन्वीला महाविजेती घोषित करण्यात आले.

तीन महिन्यांपूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या या शोमध्ये एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले होते.

या सर्वांवर मात करत तन्वीने हा बहुमान पटकावला आहे.

विजेत्या तन्वी कोलतेला कलर्स मराठीकडून १५ लाख रुपयांची धनराशी आणि मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

याव्यतिरिक्त तिला पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे १० लाख रुपयांचे वाऊचर, रेवा डायमंडकडून नॅचरल डायमंड ज्वेलरी आणि तुनवाल ई मोटर्सची लिथीनो प्रो ई-बाइक बक्षीस म्हणून मिळाली.

रितेश देशमुख आणि ‘राज शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून तिला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.

विजेतेपद मिळाल्यानंतर तन्वीने आपला आनंद व्यक्त केला. हा प्रवास स्वतःची ओळख करून देणारा आणि कठीण प्रसंगात ठाम राहायला शिकवणारा होता, असे तिने नमूद केले.

प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंबा हीच आपली खरी ताकद असल्याचे सांगत, तिने हा विजय आपल्या कुटुंबाला समर्पित केला.

घरात असताना कामावरून आणि ओळखीवरून होणाऱ्या टिकेला उत्तर देताना, तिने आपण आता एक ‘ब्रँड’ म्हणून बाहेर पडत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*