दापोली : शिवसेना सोशल मीडियाच्या संघटनात्मक विस्ताराचा भाग म्हणून दापोलीतील स्वरूप नम्रता नंदकुमार महाजन यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना सोशल मीडिया कोकण विभागाच्या वतीने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली.
या निवडीमुळे दापोलीतील राजकीय आणि सोशल मीडिया क्षेत्रातून महाजन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सूचनेनुसार या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिवसेना सोशल मीडियाचे उपनेते प्रतिक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाच्या माध्यमातून ही संघटनात्मक प्रक्रिया पार पडली.
दापोली तालुक्यातील सामाजिक समस्या, प्रशासकीय अडचणी तसेच शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन महाजन यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सध्याच्या काळात सोशल मीडिया हे राजकीय संवाद आणि संघटनात्मक संपर्काचे प्रभावी माध्यम ठरत आहे. पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणे, विविध उपक्रमांना डिजिटल व्यासपीठ मिळवून देणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे, यासाठी सोशल मीडिया यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
या पार्श्वभूमीवर उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना सोशल मीडियाचे संघटन अधिक व्यापक करण्याचे आव्हान आता महाजन यांच्यासमोर असणार आहे.
या निवडीबद्दल स्थानिक आमदार तथा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह विविध राजकीय व पक्षीय वर्तुळातून महाजन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply