रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष देव यांचे गोवा येथे दुःखद निधन झाले.
अत्यंत हुशार, व्यवस्थापन कौशल्य असणारे डॉक्टर सुभाष देव यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यासारखा ऋषितुल्य शिक्षण तज्ञ रत्नागिरीकरांनी गमावला आहे, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार सुरेश प्रभू यांनी डॉक्टर देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे

खासदार सुरेश प्रभू म्हणाले, माझा आणि डॉक्टर देव यांचा अनेक वर्षांचा संपर्क होता. रत्नागिरीतील विविध क्षेत्राविषयी चर्चा, नवे उद्योग सुरू करणे, कोकण रेल्वे संदर्भाने काय करता येऊ शकेल याबाबत डॉक्टर सुभाष देव माझ्याशी नेहमीच बोलायचे. युवा पिढी घडवण्यासाठी काय केले पाहिजे, यावर ते होय नेहमीच संवाद साधायचे.

त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे. डॉक्टर देव यांचे अचानक झालेले निधन धक्कादायक आहे, हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो, अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली.