रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली शहराच्या शिवसेना प्रभारी शहरप्रमुखपदी सुनील शंकर रिसबूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून २६ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत नियुक्ती पत्र काढण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही जबाबदारी सुनील शंकर रिसबूड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
शिवसेना सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांनी हे नियुक्ती पत्र जारी केले असून, पक्षांतर्गत निवडणुका होईपर्यंत ही नियुक्ती कायम राहणार असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
नवनियुक्त प्रभारी शहरप्रमुख सुनील शंकर रिसबूड हे बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करतील, तसेच दापोली शहरात सर्वांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष वाढीसाठी जोमाने कार्य करतील, असा विश्वास या नियुक्ती पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीनंतर ‘माय कोकण’शी बोलताना नवनियुक्त प्रभारी शहरप्रमुख सुनील रिसबूड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब, शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. त्याचबरोबर शाखेमध्ये येणाऱ्या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन.

