रत्नागिरी – महाड – वसई गाडीचा झाला हातखंबा येथे अपघात

अपघात स्थळी पालकमंत्री ना.उदयजी सामंत स्वतः उतरून केले मदत कार्य

रत्नागिरी : राज्याचे उद्योमंत्री ना.उदय सामंत हे रत्नागिरीतून महाडच्या दौऱ्यावर जात असताना त्यांना त्यांच्या गाडीच्या समोरच रत्नागिरी वसई गाडीचा अपघात होऊन प्रवासी त्या बस मध्ये अडकले होते.

आपघात पाहिल्यानंतर रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत स्वतः गाडीतून खाली उतरून त्यांनी स्वतःच्या कोणत्याही सुरक्षेचा विचार न करता मदत कार्याला सुरवात केली.

तात्काळ त्यांनी आपल्या सहकाऱ्या घेवून एसटी बस मध्ये अडकलेल्या २१ लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम केले.

ते एवढ्यावर थांबले नाही तर महाडचा दौरा असताना अपघातात जे जखमी झाले होते त्या प्रवाशांना त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

त्यांनी केलेल्या या मदतकार्याबद्दल एसटी बस मधील त्या सर्व प्रवाशांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*